किनवट:-
येथील साने गुरूजी जयंती व साने गुरूजी रूग्णालयाच्या 28 व्या वर्धापन दिनानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात चित्रकला व रंगभरण, सांस्कृतिक कार्यक्रम,
संगित महोत्सव, युवा प्रबोधन, व्याख्यान, कवी संम्मेलन, भौतिकोपचार शिबीर व रुग्णांप्रति कृतज्ञता सोहळा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
24 डिसेंबर साने गुरूजी यांच्या जयंती दिनी सकाळी 10.00 वाजता महाराष्ट्र ग्रामिण बँक
यांच्या सहकार्याने शालेय विद्यार्थी व इतरांसाठी रंगभरण व चित्रकला स्पर्धा होणार असुन कला शिक्षक शिवराज बामणीकर, कविता जोशी, बँकेचे शाखाधिकारी श्री. रूपेश दलाल हे उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 11.00 वाजता एमआयडीसी नांदेड रोड, कोठारी येथील सुरू होत असलेल्या साने गुरूजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलच्या बांधकामचा दुसरा टप्पा माता -बाल रूग्णालयाचे भूमिपूजन साने गुरूजी रूग्णालयात जन्मलेली बालके व माता यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार भिमराव केराम असुन माजी आमदार प्रदिप नाईक, आर्किटेक्ट गौतम मेहता, पुणे,वैद्यकीय बांधकाम सल्लागार श्री. अमेय समेळ, पुणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दुपारी 4.00 वाजता सांस्कृतिक कला स्पर्धा होणार असुन यात गायन, वादन, नृत्य, नाटिका व नकला यांचे सादरीकरण होणार आहे. गटशिक्षण अधिकारी श्री. ज्ञानोबा बने, अनिल महामुने व उत्तम कानिंदे हे प्रमुख पाहूणे आहेत.
सायंकाळी 7.00 वाजता स्व. उत्तमरावजी राठोड स्मृती संगित महोत्सवाचा कार्यक्रम होणार असुन सौ. मानसी व श्री स्वरूप प्रमोद देशपांडे
यांचा भाव भक्ती व नाट्यगितांचा कार्यक्रम होणार असुन संगित शिक्षक प्रमोद देशपांडे, तबलापटू प्रशांत गाजरे व व्हायोलिन वादक पंकज शिरभाते हे साथ करणार आहेत.
दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 10.300 वाजता युवा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले असुन अंधश्रध्दा निर्मुलनाचा कायदा - निर्मीती, उपयोगीता, अंमलबजावणी व समज - गैरसमज याबाबत अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, लातूर हे मार्गदर्शन करणार आहेत. प्राचार्या सविता शेटे, बीड ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आहेत. सायंकाळी 5.30 वाजता पद्मविभूषण बाबा आमटे स्मृती व्याख्यानमाले निमीत्त डॉ. प्रल्हाद लुलेकर, छ. संभाजीनगर यांचे व्याख्यान होणार आहे. डॉ. वासूदेव मुलाटे, छ. संभाजीनगर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. रात्री 8.00 वाजता निमंत्रित व स्थानिकांचे कवी संम्मेलन होणार असुन सुप्रसिध्द कवी - गितकार प्रकाश घोडके, पुणे प्रा. डॉ. विनायक पवार, पनवेल प्रा. डॉ. आदिनाथ इंगोले, नांदेड यांच्यासह स्थानिक कविंचा सहभाग राहणार आहे. प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर, नांदेड हे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत.कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. पंजाब शेरे आहेत.
दि.26 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता श्रमर्षी बाबा आमटे यांना जयंती निमीत्त अभिवादन करून महिलांसाठी भौतिकोपचार शिबीर होणार आहे. डॉ. पूनम तौर, डॉ. मधुसुदन यादव व डॉ. शिवाणी बेलखोडे हे उपचार करतील.
समारोपीय कार्यक्रमात वर्षभरात साने गुरूजी रूग्णालयात प्रसुत झालेल्या महिला व शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सोहळा संपन्न होणार आहे.
या विविध कार्यक्रमांस किनवट - माहूर तालुक्यातील व तेलंगणा सीमावर्ती भागातील नागरिकांनी उपस्थित रहावे