Ticker

6/recent/ticker-posts

डॉ.आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर व एक वही एक पेन अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद किनवट,दि.६ : विश्वरत्न डॉ.बाबासाहेब


डॉ.आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर व एक वही एक पेन अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद 

किनवट,दि.६ : विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कृतीशील विनम्र अभिवादन करण्यासाठी आज(दि.६)सकाळी १० वाजता  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ घेण्यात आलेल्या    

"रक्तदान शिबिराला व एक पेन एक वही अभियानाला" उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार भीमराव केराम व भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या हस्ते झाले.शिबिरात जवळपास ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

 ‌अभियानाचे हे सहावे वर्ष होते,अशी माहिती आयोजक अॅड.सम्राट मिलिंद सर्पे व निखिल कावळे यांनी दिली.
   

 युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव राहुल सर्पे यांच्या सौजन्याने व गुरू गोविंदसिंग ब्लड बँक यांच्या सहकार्याने झालेल्या या शिबिरात व अभियानात मोठ्या संख्येने आंबेडकर प्रेमी नागरिक, विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते