Ticker

6/recent/ticker-posts

किनवट आदिवासी दुर्गम तालुक्यात मोबाइल मेडिकल युनिट चालू करण्याची मागणी


किनवट आदिवासी दुर्गम तालुक्यात मोबाइल मेडिकल युनिट चालू करण्याची मागणी


किनवट (प्रतिनिधी) : आदिवासी नक्षलग्रस्त तालुक्यातील अनेक गाव, पाडे, तांडे, वांड्यापर्यंत  अद्याप शासनाची आरोग्य सेवा पोहोचलेली नसल्याचे निदर्शनास आले असून त्यानुसार अनरिच टू रिच या संकल्पनेचा आधार घेत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत मोबाइल मेडिकल युनिट सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बबन वानखेडे यांनी केली आहे.  

मोबाइल मेडिकल युनिट मुळे रुग्णांवर प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोफत औषधोपचार केले जातात.

 हा प्रकल्प किनवट सारख्या आदिवासी दुर्गम नक्षलग्रस्त भागात  चालू करणे अत्यंत आवश्यक आहे.

ग्रामीण भागातील गरोदर मातांची नियमित तपासणी, प्रसूती, बालकांची तपासणी व उपचार देण्याचा या प्रकल्पाचा मूळ उद्देश आहे.

 त्यानुसार प्रत्येक गावात जाऊन रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जातात. वेळप्रसंगी गरोदर मातांची प्रसूती करण्याचीही व्यवस्था मोबाइल मेडिकल युनिटअंतर्गत करण्यात येते.


प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी ग्रामीण अथवा जिल्हा रुग्णालयात रुग्णास पाठविण्याबाबतचे मार्गदर्शन हे डॉक्टर करतील. शासकीय व सण-उत्सवांच्या सुट्या वगळता साधारणत: 20-22 दिवस ही सेवा दिली जाते. 

याद्वारे महिनाभरात दीड ते दोन हजार रुग्णांवर मोफत उपचार करणे शक्य होऊन उपजिल्हा रुग्णालयावर येणारा अतिरिक्त ताण कमी करण्यास मदत होईल.

  अशा ह्या महत्त्वकांक्षी मेडिकल मोबाईल युनिट योजना ही किनवट तालुक्यातील डबघाईस आलेल्या आरोग्य यंत्रणेसाठी नव संजीवनी ठरेल. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक विभागाने या मागणीला गांभीर्याने घेऊन त्वरित

 किनवट तालुक्यात मेडिकल मोबाईल युनिट त्वरित चालू करण्यात यावे. अशी मागणी बबन वानखेडे यांनी केली आहे.