Ticker

6/recent/ticker-posts

उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे #सिटीस्कॅन_मशीन चालू झाली असून सोमवार व मंगळवार हे दोन दिवस सध्या सिटीस्कॅन केले जात आहे



उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे #सिटीस्कॅन_मशीन चालू झाली असून सोमवार व मंगळवार हे दोन दिवस सध्या सिटीस्कॅन केले जात आहे.  

आतापर्यंत 22 रुग्णाचे सिटीस्कॅन करण्यात आलेले आहे. अशी माहिती उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, वैद्यकीय  अधीक्षक श्री डॉ. घडसिंग साहेबांनी दिली. 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भोसीकर साहेबांना संपर्क केला असता बिंदु नामावलीतील रेडिओलॉजिस्ट पदाला लवकरच मान्यता घेऊन पूर्ण वेळ रेडिओलॉजिस्ट देऊन सिटीस्कॅन मशीन नियमित चालू ठेऊ असे सांगितले.

एखादी मोठी शंका दूर करण्यासाठी डॉक्टर कडून सीटी स्कॅन करायला सांगितले जाते. कारण सीटी स्कॅन शरीराच्या अंतर्गत भागांची तपशीलवार माहिती देते ज्यात

1. डोक्याचा  गंभीर आजार असल्यास
2. हाडांचा आजार असल्यास
3. हृदयाची समस्या, गुडघ्याची समस्या असल्यास
4. छातीचे सीटी स्कॅन 
5. उदर किंवा पोटाचे सीटी स्कॅन 
6. पाठीचा कण्याचे सीटी स्कॅन
या व  इतर अनेक शारीरिक समस्या साठी सिटीस्कॅन करणे आवश्यक असते.

यामुळे उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथील सिटीस्कॅन मशीन नियमित कार्यान्वित असणे आवश्यक आहे.