मातोश्री कमलताई ठमके इंग्रजी शाळेतील एनसीसीच्या राज्यस्तरीय शिबीरात फायरिंग प्रशिक्षणाने छात्र सैनिकांत उत्साह
किनवट : येथून जवळच असलेल्या कोठारी (चि) येथील 'मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मेडियम शाळेच्या भव्य प्रांगणात, राष्ट्रीय छात्रसेना औरंगाबाद ग्रुपच्या 52 महाराष्ट्र बटालियन नांदेड द्वारा आयोजित वार्षिक शिबिरात राज्यभरातील 509 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्या जात आहे.
या शिबीरात फायरिंग सह अन्य प्रशिक्षणाने छात्र सैनिकांत उत्साह संचारला आहे.
दरवर्षी सुमारे 3000 छात्र सैनिकांना चार शिबीरातून प्रशिक्षण दिले जाते. तारीख 8 ते 17 जानेवारी 2024 दरम्यान आयोजित येथील हे शेवटचे शिबिर असून या शिबिरात 450 मुलं व 59 मुली अशा 509 विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्रे,
आपत्ती व्यवस्थापन, शारीरिक सक्षमता, सामाजिक, सामुदायिक व सांस्कृतिक विकासाचे प्रशिक्षण दिले जात असून त्यांच्यात अविरत देशसेवेचा निर्धार रुजविला जात आहे.
कमांडींग ऑफिसर कर्नल एम. रंगा राव यांनी आपल्या दूरदृष्टीने प्रशिक्षणासाठी या जागेची निवड केली आहे.
यामुळे आदिवासी , डोंगरी, दुर्गम भागातील मुलांना एनसीसी प्रती प्रेरणा मिळेल.
या देश कार्यासाठी आपल्या शाळेची भव्य वास्तु व मैदान उपलब्ध करून मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांनी मोठा हातभार लावला आहे.
विशेष म्हणजे या शिबिरात अहमदनगर, धुळे, लातूर आणि धाराशिव येथील छात्र सैनिक सहभागी असून, ते सर्व येथील प्रशिक्षणाने भारावून गेले आहेत.
'एनसीसी' चे 52 महाराष्ट्र बटालियन नांदेडचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम रंगाराव व ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर लेफ्टनंट कर्नल के. दिलीप रेड्डी
असे एनसीसी'चे दोन वरिष्ठ अधिकारी यांच्यासह कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षक आणि सहायक अधिकारी छात्रांना प्रशिक्षण देत आहेत.
या अधिकाऱ्याच्या निगराणी मध्ये सदर वार्षिक प्रशिक्षण शिबिर चालू आहे.
दहा दिवस चालणाऱ्या प्रशिक्षण शिबिराची वेळ सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे. यामध्ये छात्र प्रशिक्षणार्थ्यांना फायरिंग,
मॅप रीडिंग, ड्रिल, बॅटल क्राफ्ट, नॅशनल इंटिग्रेशन, जजिंग डिस्टन्स इत्यादी सैनिकी प्रशिक्षण दिले जात आहे.
रात्री आठ ते नऊ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून वैविध्यपूर्ण महाराष्ट्रीय संस्कृतीचे प्रदर्शन केले जात आहे.
प्रशिक्षणा दरम्यान विविध साहसी प्रात्यक्षिक स्पर्धा, खेळांच्या स्पर्धांसह विविध शैक्षणिक प्रतियोगितांचे आयोजन केल्या जात असून उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या छात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षण समारोप प्रसंगी स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र आणि सुवर्ण, रजत व कांस्य पदक देऊन गौरविले जाणार आहे.
येथील छासेनेच्या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीरात मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके ,