Ticker

6/recent/ticker-posts

किनवट ता.प्र दि ०५ किनवट कृषी उत्पन्न समितीच्या माध्यमातुन शेतक-यांच्या करिता विविध उपाययोजना राबवुन कायम स्मरणात राहतील अशी विधायक कामे होणार असल्याचे निदर्शनास आल्यामुळे बाजार समिती संचालक मंडळाला बदनाम करण्याचे षडयंत्र आमच्या राजकिय विरोधकांनी


किनवट ता.प्र दि ०५ किनवट कृषी उत्पन्न समितीच्या माध्यमातुन शेतक-यांच्या करिता विविध उपाययोजना राबवुन कायम स्मरणात राहतील अशी विधायक कामे होणार असल्याचे निदर्शनास आल्यामुळे बाजार समिती संचालक मंडळाला बदनाम करण्याचे षडयंत्र आमच्या राजकिय विरोधकांनी रचले असल्याने त्यांचे मनसुबे आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही 

असे माध्यमांशी बोलतांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे पाटील यांनी सांगितले आहे. 

मा. आ. प्रदीप नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे 

यांनी मार्गदर्शनात किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ आगामी काळात विविध लोकोउपयोगी कामे करणार आहोत. शेतक-यांच्याकरिता निवारा, शेतकरी भवन, विविध शेतमालाची हमीभावाने कायमस्वरुपी खरेदी केंद्र,

 शासनांच्या योजना थेट शेतक-यांना मिळाव्या या करिता चे नियोजन, व्यापारी व शेतक-यांच्या व्यवहारांवर नियंत्रण तथा देखरेख होऊन 

योग्य प्रकारे व्यवहारपार पडावे या करिता आवश्यक पथक नियुक्त करणे या व अशा अनेक उपाययोजना राष्ट्रावादी कॉग़्रेस पक्षाचे माजी आमदार प्रदिप नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही राबविणार असल्याचे आमच्या राजकिय विरोधकांना माहीती झाल्याने

 त्यांनी आम्हाला बदणाम करण्याकरिता आमच्या विरोधात खोट्या  बातम्या प्रकाशित करण्याचे कारस्थान केले जात आहे. 


परंतु किनवट माहुर विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, जनता हि आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असुन शेतक-यांच्या व किनवट माहुर विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या विश्वासाला कधीही आम्ही तडा जाऊ देणार नाही

 असे आश्वासन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.