Ticker

6/recent/ticker-posts

कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविण्याची शिक्षण प्रेमी व पालक वर्गातून मागणी किनवट प्रतिनिधी : परीक्षांमध्ये चालणाऱ्या कॉप्या ही शिक्षण विभागाला लागलेली कीड असून


  कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविण्याची शिक्षण प्रेमी व पालक वर्गातून मागणी

किनवट प्रतिनिधी  : परीक्षांमध्ये चालणाऱ्या कॉप्या ही शिक्षण विभागाला लागलेली कीड असून यामुळे खऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून याचे उच्चाटन व्हायलाच पाहिजे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक 

अशा इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या परिक्षेत सर्रासपणे चालणा-या कॉप्या बंद करुन कॉपीमुक्त अभियान मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन शिक्षण प्रेमी सदाशिव जोशी, विश्वस्त स्वामी विवेकानंद टेक्नो स्कुल, 

बबन वानखेडे सामाजिक कार्यकर्ता किनवट, ज्योतिबा गोणारकर ग्रामपंचायत सदस्य गोकुंदा व अनेक पालकाच्या पालकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन उपविभागीय अधिकारी किनवट यांना दिले आहे .

शिक्षण विभागाच्या दुर्लक्षाने व शालेय व्यवस्थापणाच्या मनमानी कारभारामुळे इयत्ता 10 वी आणि 12 वी तसेच इतर सर्वच परिक्षेत सर्रास कॉप्या चालत आहेत. याचा परीणाम होतकरु विद्यार्थ्यांवर होऊन प्रामाणिक विद्यार्थी सुध्दा परिक्षेत सर्रास चालणा-या कॉप्या बघुन 

त्यांची सुध्दा कठोर परीश्रम करुन चांगले गुण घ्यावे अशी मानसिकता न राहता आपणही कॉप्या करुन सहज मेरीट गुण मिळवू शकतो अशी भावना झाली आहे.

 सन 2010 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी साहेब यांनी शिक्षण विभाग, पोलीस विभाग, महसुल विभाग व संबंधीत सर्वच विभागाशी उत्कृष्ट समन्वय साधून नियोजन बध्द कॉपीमुक्त अभियान राबविले व नंतर कॉपीमुक्त अभियान नांदेड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आले व त्याचे चांगले परीणामही मिळाले, 

परंतु गेल्या चार वर्षापासून सदर अभियानाचा बोजवारा उडाला असून शिक्षण विभागाच्या दुर्लक्षाने व शालेय व्यवस्थापणाच्या मनमानी कारभारामुळे सर्वच परीक्षा कॉपी मुक्त परीक्षा ऐवजी कॉपी युक्त परीक्षा होत आहेत असे म्हणण्याची वेळ आली आहे.


या सर्व प्रकारामुळे गुणवंत विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर व क्षमतेवर परीणाम होऊन त्यांची अभ्यास करण्याची जिज्ञासा कमी होणार नाही यासाठी कठोर पाऊल उचलत कॉपीमुक्त अभियान राबऊन देश सेवेसाठी चांगले सक्षम असणारे, देशाचे भविष्य असणारे, 

युवक घडावे यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी  सकारात्मक विचार करुन सन 2010 प्रमाणे कॉपीमुक्त अभियान राबवावे अशी मागणी सदाशिव जोशी, विश्वस्त स्वामी विवेकानंद टेक्नो स्कुल, बबन वानखेडे सामाजिक कार्यकर्ता किनवट, 

ज्योतिबा गोणारकर ग्रामपंचायत सदस्य गोकुंदा, सुचित्रा मारोती अभंगे, गणिता नीलकंठ चव्हाण,

 गणेश विठ्ठल वंजारे, गणेश धोंडोपंत बीजामवार, अंकुश दत्ता पवार, सदाशिव नरसिंगराव इंदुरे, बालाजी किशनराव पोपुलवाड, 

गजानन माधव बोरुले, उत्तम माधव गावत्रे, सुनिल अशोकराव मुंडे, "सुनिल नारायणराव चांदुरकर, रोहन उत्तम कुऱ्हाडे, 

शहजाद फारूख खत्री सर्व सुज्ञ पालक यांच्या  स्वाक्षऱ्या असणारे निवेदन उपविभागीय अधिकारी किनवट त्यांना दिले आहे.