Ticker

6/recent/ticker-posts

बाजार समितीच्या चुकीच्या कायद्याविरोधात आज निषेध नोंदवून एक दिवसीय बंद पाळणारहा घातक घाट हाणून पाडण्यासाठी सामील व्हा- गजानन मुंडे


बाजार समितीच्या चुकीच्या कायद्याविरोधात
 आज निषेध नोंदवून एक दिवसीय बंद पाळणार
हा घातक घाट हाणून पाडण्यासाठी सामील व्हा- गजानन मुंडे


किनवट (प्रतिनिधी बाजार) समितीचे अस्तित्व धोक्यात आणणारे कायदे आज सरकार करू पाहत आहे.


महाराष्ट्र कृषी उत्पन्न विकास व विनिमय अधिनियम 1963 मधील विद्यमान सरकारने केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने हा घाट घातक होत आहे. ते अत्यंत चुकीचे आहे.


 त्यामुळे बाजार समितीवर वाईट परिणाम होतील या सरकारच्या सुधारणे विरोधात आज महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एक दिवसीय संप पुकारत निषेध नोंदवत आहेत. 

सदर पुकारलेल्या एक दिवशीय बंद ला पाठिंबा देऊन त्यात सामील होण्याचे आवाहन किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन पाटील मुंडे यांनी केले आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रामुख्याने 20 फेब्रुवारी सर्व राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिवांची बैठक पुणे येथील कृषी महाविद्यालय शिवाजीनगर येथे बैठक पार पडली. 

त्यामध्ये सन 2018 चे महाराष्ट्र विधानसभा क्रमांक 64 महाराष्ट्र कृषी उत्पन्न व पणन विभाग विनिमय अधिनियम 1963 मध्ये प्रस्तावित केलेल्या सुधारण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली.

त्यामध्ये सीमांकित बाजार, आवार बाजार तळ, उप बाजार तळ,निर्माण करणे आहेत. 

हमाल, मापारी,  कष्टकरी व सहकाराचा पाया असणाऱ्या घटकावरील दीर्घकालीन दुष्परिणाम यावर चर्चा करण्यात आली. 

यावर शासनाने बदल न करण्याच्या मुद्द्यावर आज दिनांक 26 रोजी एक दिवशीय संप पुकारत वज्रमुठ बांधण्यात आल्याचे गजानन पाटील मुंडे यांनी सुचविले आहे.


दिनांक 26 रोजी किनवट तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सर्व व्यवहार बंद असणार आहेत. बंद काळात कोणतीही खरेदी-विक्री होणार नाही. आणि कार्यालयीन कामकाजही बंद असणार आहे. 

अशी माहिती किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन पाटील मुंडे यांनी दिली आहे.