Ticker

6/recent/ticker-posts

प्रेमसिंग मोतीराम आडे, वय 52 वर्षे, पद ग्रामसेवक, ग्रामपंचायत मांडवी, अतिरिक्त पदभार ग्रामपंचायत चिखली, ता.किनवट, जि.नांदेड रिश्वत लेते पकड़ा गया


*यशस्वी सापळा कार्यवाही* 
➡ *घटक* :- नांदेड युनिट
➡ *फिर्यादी* :- पुरुष, वय 36 वर्षे
➡ *आरोपी* :-  
        प्रेमसिंग मोतीराम आडे, वय 52 वर्षे, पद ग्रामसेवक, ग्रामपंचायत मांडवी, अतिरिक्त पदभार ग्रामपंचायत चिखली, ता.किनवट, जि.नांदेड
➡ *तक्रार प्राप्त* :- 
       दि. 18/04/2024
 ➡ *लाच मागणी पडताळणी*  :-  
        दि. 23/04/2024
➡ *लाचेची मागणी रक्कम* :- 
       रू. 5,000/- 
 ➡ *लाच स्विकारली* :- 
        दि. 23/04/2024
 ➡ *लाच स्विकारली व हस्तगत रक्कम* :- 
        रू.5000/-
 ➡ *थोडक्यात हकिकत*  :-
       यातील तक्रारदार यांनी मौ. चिखली, ता.किनवट, जि.नांदेड येथील शेत सर्वे नं. 118/2 मधील खरेदी केलेली मोकळी जागा (प्लॉट) ग्रामपंचायत चिखली येथील 8 अ रजिस्टरवर नोंद करण्यासाठी ग्रामसेवक प्रेमसिंग आडे, ग्रामपंचायत मांडवी अतिरिक्त पदभार ग्रामपंचायत चिखली यांना भेटले असता, त्यांनी तक्रारदाराचे सदरचे शासकीय कामासाठी तक्रारदार यांना रूपये 5,000/- ची मागणी केली. 
    सदरची रक्कम रुपये 5,000/- ही लाच असल्याचे तक्रारदार यांना खात्री झाल्याने व त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे तक्रार दिली. 
       आज दि. 23/04/2024 रोजी आरोपी लोकसेवक ग्रामसेवक आडे यांनी तक्रारदार यांना शासकीय पंचासमक्ष रूपये 5,000/- लाचेची मागणी केली.
    त्यानंतर पंचासमक्ष लाचेची रक्कम रूपये 5,000/- स्वतःचे राहते घरी गोकुंदा, ता.किनवट, जि.नांदेड येथे स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड च्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले आहे. 
     आरोपी लोकसेवक प्रेमसिंग मोतीराम आडे यांना ताब्यात घेण्यात आले असुन पो.स्टे. किनवट, ता.किनवट, जि.नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे.
➡ *मार्गदर्शक* :-
       डॉ. राजकुमार शिंदे भा.पो.से.
       पोलीस अधीक्षक 
       अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड
        मोबाईल क्र. 9623999944 
➡ *पर्यवेक्षण अधिकारी* :-
       श्री राजेंद्र पाटील, 
       पोलीस उप अधीक्षक 
       अँटी करप्शन ब्युरो,नांदेड 
        मोबाईल क्र. 7350197197
 ➡ *तपास अधिकारी* :-
       श्री अरविंद हिंगोले,
       पोलीस निरीक्षक,
       अँटी करप्शन ब्युरो, नांदेड.
➡ *सापळा कारवाई पथक* :- 
        पोह/सुर्यकांत वडजे, पोना/राजेश राठोड, पोकॉ/विनयकुमार नुकलवार, स.खदीर स.हकीमपाशा, चापोह/मारोती सोनटक्के, अँटी करप्शन ब्युरो,नांदेड
 
 *नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम, एजंट यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.*
*दुरध्वनी क्रमांक 02462253512*
*टोल फ्रि क्रं.1064*