दुःखद निधन !🙏💐 श्री गोपालराव चनमनवार ( गोपाल हॉटेल ! ) यांचा एकलुता एक चिरंजीव श्री लक्ष्मण याचे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन !
लक्ष्मण गोपाळराव चनमनवार यांचे आज दिनांक 9 मे 2024 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले आहे.
तरी त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक 10 मे 24 रोजी सकाळी 9 वाजता होणार
असून अंत्ययात्रा त्यांचे राहते घर राजेंद्र नगर, गणपती मंदिर शेजारी येथून निघणार आहे.
तो माझा कलासमेंट वर्गात आम्ही जिप हायस्कूल मुलाचे किनवट इथे एकाच बेंचवर बसायचो ! अत्यंत हुशार !
दहावी नंतर ट्रव्हलस / भिसी / हाटेल या धंद्यात तो आला ! किनवट शहरात लक्ष्मण सेठ म्हणून ओळखू लागला !
लग्नानंतर तो नागपूर ला सेटल झाला ! मेडीकल लाईन मध्ये काम करायचा ! दवाखानात सगळ्यांना मदत करायचा ! त्याला एकुलती एक मुलगीच आहे !
मागे दोन महिन्यापूर्वी त्याची भेट झाली होती ! त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य राहायचे ! त्याला बघुन / बोलून आनंद वाटायचे !
असा दिलदार मित्र मिळणे अवघडच आहे ! नियतीने त्याला अर्धवट च घेऊन गेला !