Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी मुंबईच्या मोर्चात सहभागी व्हावे : संजीव वानखेडेकिनवट : शासनाच्या विविध व जनकल्याणकारी योजना राबविण्यात


ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी मुंबईच्या मोर्चात सहभागी व्हावे : संजीव वानखेडे
किनवट : शासनाच्या विविध व जनकल्याणकारी योजना राबविण्यात महत्वाची भूमिका बजावणारे ग्रामपंचायत कर्मचारी आज दारिद्रय नारायणाचा अवतार म्हणून जगत आहेत. ग्रामपंचायत कामगार आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोर्चा काढत असून,

 किनवट तालुक्यातील ग्रामपंचायत कामगारांनी 1 जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानावरुन निघणार्‍या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजीव अंबादास वानखेडे यांनी केले आहे.


मुंबईच्या आझाद मैदानावरून विधानसभेवर मोर्चा धडक देणार आहे. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचार्‍यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करणे, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना निवृत्तीवेतन लागू करणे, कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निधी संघटना 

(ई.पी. एफ.) या कार्यालयात जमा करणे, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना वर्ग 3 व 4 च्या पदावर नियुक्ती द्यावी, यासह विविध मागण्या रेटून धरल्या जाणार आहे. सदर मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्याध्यक्ष विलास कुमरवार, 

सरचिटणीस दयानंद एरंडे व कार्याध्यक्ष जनार्दन मुळे यांनी या आंदोलनाची हाक दिली असून या मोर्चाचे नेतृत्व आ. सचिन अहिर करणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त कर्मचार्‍यांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष संजीव अंबादास वानखेडे, 

उपाध्यक्ष अनिल कोत्तावार, सचिव अरविंद घुगे, कार्याध्यक्ष विठ्ठल कागणे, संघटक भीमराव कानिंदे, सहसचिव कैलास शिरपुरे, मारोती येरावार, 

गणेश गायकवाड, रतन नोळे, ताराचंद जाधव, लक्ष्मीबाई दर्शनवाड, जयवंत टारपे, भास्कर सूर्यवंशी, भिकू पवार, लक्ष्मण मडावी, रामदास तलांडे, तथागत वावळे यांनी केले आहे.