तालुक्यातील मोहपूर येथील युवक शंकर मधुकर आमले हा सकाळी ८ वाजताच्या सुमारास शेताकडे जात असतांना अचानक अस्वलाने त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून गंभीर केल्याची घटना सिंदगी मोहपुर शिवारात घडली.
अस्वलाने त्याच्या उजव्या डोळ्यावर व शरीरावर गंभीर जखमा केल्याची घटना कळाली असता गावातील नातलगांनी जखमीला प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे दाखल करून पुढील उपचारासाठी आदिलाबाद येथे हलवण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की मोहपूर येथील शंकर मधुकर आमले हा युवक सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेताकडे जात असताना सिंदगी मोहपूर शिवारातील
जंगलामध्ये दडून बसलेल्या अस्वलाने अचानक त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्याच्या चेहऱ्यावर व शरीरावर हल्ला चढवत त्याला रक्तबंबाळ केले.
गावकऱ्यांनी बेशुद्ध अवस्थेत जखमी युवकास उपजिल्हा रुणालय गोकुंदा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी आदिलाबाद येथे हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच वन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाची भेट घेऊन योग्य ती कारवाई करण्यात आली.