Ticker

6/recent/ticker-posts

आदिवसी किनवट तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाच आजारी पडली आहे. कर्मयोगी मा. खा. पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांची एम्सच्या अध्यक्षपदी निवड


कर्मयोगी मा. खा. पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांची एम्सच्या अध्यक्षपदी निवड 💐💐 

मानवी कल्याणासाठी वैद्यकीय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारे कर्मयोगी मा. खा. पद्मश्री डॉ. विकास महात्मे सर यांची विधानभवनात भेट झाली. त्यांची नागपूर येथील एम्सच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे ऐकून आनंद झाला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आणि आदिवासी किनवट तालुक्यातील आरोग्य सेवेवर चर्चा केली. 

आदिवसी किनवट तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाच आजारी पडली आहे. पण आज घडीला तालुक्यात अत्याधुनिक सर्व सेवा सुविधांनी सुसज्ज असे एकही रुग्णालय किनवट शहरात नाही. त्यामुळे गंभीर आजाराच्या रुग्णांना पुढील उपचारासाठी मुंबई, हैदराबाद  येथील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जावे लागले. त्यात वेळ, पैसा, श्रम खर्च होतो. आणि मानसिक त्रास वेगळाच सहन करावा लागतो. आशा रूग्णांना देशातील सर्वोत्तम सेवा सुविधांनी सुसज्ज असलेल्या शासकीय एम्स रुग्णालयात पाठविले तर काही प्रमाणात रुग्णांना आधार मिळेल त्यासाठी काही ठोस पावले उचलायला हवीत अशी इच्छा व्यक्त केली.

या प्रसंगी युवा नेते मा. नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, आमचे स्नेही युवा नेतृत्व आमन कुंडगीर, प्रशांत मोरे आणि अनंत बनसोडे उपस्थित होते.