बुद्धिबळ खेळल्याने स्मरणशक्ती वाढते , नैराश्य व चिंता यांचा धोका कमी होतो यामुळे विद्यार्थ्यांनी प्राधान्याने हा खेळ खेळावा
-अनिल महामुने
किनवट : बुद्धिबळ खेळणं हे मनाला तीक्ष्ण करते, यामुळे आय क्यू ( IQ ) पातळी सुधारते. याशिवाय या खेळातून शिकण्याची क्षमताही झपाट्याने विकसित होते. बुद्धिबळ हा मेंदूच्या व्यायामासाठी एक उत्तम खेळ आहे. बुद्धिबळ खेळल्याने स्मरणशक्ती वाढते. यामुळे नैराश्य आणि चिंता यांचा धोका कमी होतो. यामुळे विद्यार्थ्यांनी प्राधान्याने हा खेळ खेळावाच तसेच आपल्या आवडीच्या खेळात प्राविण्य मिळवावे. सध्या सुरू असलेल्या जागतिक ऑलिम्पिकचे सामने सुद्धा पाहून आपली खेळ भावना जागृत करावी , असेअसे प्रतिपादन पीएम पोषण शक्ती निर्माण योजना किनवटचे अधीक्षक अनिल महामुने यांनी केले
येथून जवळच असलेल्या कोठारी (चि) येथील मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मानव विकास समन्वयक उत्तम कानिंदे , एम. के. टी.चे प्राचार्य एस. व्ही. रमणराव व राष्ट्रीय कोच तथा तालुका क्रीडा संयोजक संदीप यशिमोड यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
2 ऑगष्ट ते 10 सप्टेबर 2024 या कालावधीत होणाऱ्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन बुद्धीबळ खेळाने झालं. यास्पर्धेसाठी सुमेध भवरे व प्रमोद भवरे पंच होते. जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे व तालुका क्रीडा अधिकारी शिवकांता देशमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा संयोजक संदीप येशिमोड यांनी तातुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक यांचा सहकार्याने या स्पर्धांचं आयोजन केलं आहे.
पुढील स्पर्धेचे वेळापत्रक
1) कुस्ती 5 व 6 ऑगस्ट
2) योगासन 7ते 8 ऑगस्ट
3) बॅडमिंटन 9 ते 10 ऑगस्ट
4) फुटबॉल 12 13 ऑगस्ट
5) क्रिकेट 14 17 19 वयोगट मुली 21 ऑगस्ट mkt शाळा कोठारी ची
6) खोखो 22 व 23 ऑगस्ट
7) क्रिकेट 14 17 19 मुले 24 ऑगस्ट स्थळ अशोक विद्यालय पळशी
8) कबड्डी 29 व 30 ऑगस्ट
9) ॲथलेटिक्स 5 सप्टेंबर
10) हॉलीबॉल 9 व 10 सप्टेंबर