Ticker

6/recent/ticker-posts

माहूर नगर पंचायत कार्यालयास कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या - शेख सिराज रज़ा माहूर



माहूर नगर पंचायत कार्यालयास कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या -  शेख सिराज रज़ा 
माहूर(पवन कोंडे)

माहूर नगर पंचायत कार्यालयास मुख्यधिकारी हे पद मागील अनेक वर्षापासून रिक्त असून सध्या हे पद प्रभारी मुख्याधिकारी नायब तहसीलदार राजकुमार राठोड यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे एकाच अधिकाऱ्याकडे दोन दोन प्रशासकीय पदांचा कारभार  असल्यामुळे बरेच कामे खोळबली आहेत. 

त्यामुळे त्यांना एकाच पदाची जबाबदारी देऊन दुसऱ्या पदावरून कायमुक्त करा. व कामांना गती मिळण्याकरिता    नगर पंचायत कार्यालयास कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करा. 

आशा आशयाचे निवेदन एम आय एम पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष शेख सिराज रज़ा यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना तहसीलदार माहूर यांचे मार्फत निवेदन देऊन मागणी केली आहे.


माहूर येथील नगर पंचायतचे मुख्यधिकारी हे पद मागील 3 वर्षापासून रिक्त असून सध्या हे पद प्रभारी मुख्याधिकारी  नायब तहसीलदार  राजकुमार राठोड यांच्याकडे  देण्यात आले आहे. तसेच 
लवकरच माहूर नगरपंचायत च्या नगराध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपत आला आहे. 

नवीन नगराध्यक्ष निवडी साठी निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होणार   असल्याने त्यापूर्वी तरी नगरपंचायत माहूर येथे पूर्ण वेळ व कायमस्वरूपी मुख्याधिकारी यांची निवड होणे आवश्यकता आहे. 

अनेक रखडलेल्या कामामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्या करिता या बाबीचा गांभीर्याने विचार करून तातडीने दखल घेऊन माहूर नगरपंचायत कार्यालयास पूर्ण वेळ व कायमस्वरूपी मुख्याधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी. असे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आले आहे.