Ticker

6/recent/ticker-posts

वृक्षारोपण कार्यक्रम, जिल्हा परिषद हायस्कूल कार्यक्रम, जिल्हा परिषद हायस्कूल पार्डी- बोधडी ( खु ) येथे संपन्न ह.भ. प.संत श्री नारायण महाराज माधापुरकर यांच्या संकल्पनेतून जि. प. हायस्कूल पार्डी - बोधडी


वृक्षारोपण कार्यक्रम, जिल्हा परिषद हायस्कूल पार्डी-  बोधडी ( खु ) येथे संपन्न 

            ह.भ. प.संत श्री नारायण महाराज माधापुरकर यांच्या संकल्पनेतून जि. प. हायस्कूल पार्डी - बोधडी येथे आज दिनांक:-11/8/2024 रोजी पाचशे झाडे लावून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.आमदार भीमरावजी केराम साहेब होते, प्रमुख पाहुणे श्री माधवेंद्र सिंह जी,( उ. प्र) प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ नेते श्री धरमसिंगजी राठोड, सौ. संध्याताई राठोड,श्री प्रफुलजी राठोड,डॉ श्री नामदेव कराड,विभागगीय वनक्षेत्र अधिकारी गीरी साहेब,गजानन कोल्हे पाटील,बालाजी मुरकुटे, शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड,मारोती सुंकलवाड,देवानंद डोमपल्लु,अनिरुद्ध केंद्रे, आनंद मच्छेवार,प्रा.घनश्याम राठोड, विनोद पवार,पत्रकार दत्ताजी जायभाये,नागनाथ कराड सर,संतोष मुंडे,रघुनाथ कराड महाराज,सरपंच नारायण जेवलेवाड, उपसपंच बालाजी केंद्रे,संदीप देवडे
     ह .भ. प .श्री नारायण महाराज यांच्या पावन करकमलाने सर्व प्रथम वृक्षाची पूजा करन्यात आली  ह.भ.प.नारायण महाराज यानी अध्यक्षीय समारोपात वृक्षाचे महत्व सांगून ५०० विविध जातीचे वृक्षारोपण करण्यात आले.
     या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री मोहन जाधव सर यांनी प्रास्ताविक पर आपल्या मनोगतातून शालेची वाटचाल आणि शाळेला लागणारं निधी मा.आमदार साहेबांकडे मागणी केली.तत्पर मा.आमदार साहेबांनी शाळेला निधी देण्याचे घोषित केले.छत गळती आणि अर्धवट राहिलेली संरक्षण भिंत या निधीमधून होणार आहे. मा आमदार साहेबांनी आपल्या मनोगतातून पर्यावरणासाठी झाडाचे महत्त्व सांगितले.या कार्यक्रमासाठी पार्डी बोधाडी येथील पालक,नागरिक ,महिला आणि शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.कार्यक्रम यशवितेसाठी शाळेचे शिक्षक सर्व श्री ज्ञानेश्वर कोथळे,अर्जुन चव्हाण विनोद पांचाळ ,अमोल खोकले सर,बालाजी मुंडे सर,नागनाथ कांदे सर,नागनाथ गंगाधर कांदे सर,बालाजी कराड व गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी परिक्ष्रम घेतले. ,सुत्रसंचालन प्रकाश नालमवार यांनी केले तर आभार सुमेध भवरे यांनी मानले.