Ticker

6/recent/ticker-posts

किनवट तालुका प्रतिनिधी : मागील काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून खूप मोठ्या प्रमाणावर धार्मिक हिंसाचार माजविला जात आहे


किनवट तालुका प्रतिनिधी : मागील काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून खूप मोठ्या प्रमाणावर धार्मिक हिंसाचार माजविला जात आहे. 

धार्मिकतेच्या आधारावर तेथील हिंदूंना लक्ष करून त्यांच्यावर भयंकर अत्याचार सुरू आहेत. 

हिंदूंच्या श्रद्धास्थानाची तोडफोड, देव देवतांची विटंबना केली जात आहे. 

अशा या गंभीर घटनेबाबत भारत सरकारने  गांभीर्याने विचार करावा यासाठीच किनवट गोकुंदा सह तालुका भरात आज सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने बंदचे आवाहन केले. 

या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने बंद 100% यशस्वी झाला असून या बंदमध्ये अत्यावश्यक सेवाही स्वखुशीनेच सामील झाल्या होत्या. 

दूध, भाजीपाला, मेडिकल अशा विविध अत्यावश्यक सेवाही आजच्या बंद मध्ये सहभागी झाल्या होत्या.
आज सकाळपासूनच किनवट व गोकुंदा येथे बंदला प्रारंभ झाला. 

सकाळीच भाजीपाल्याच्या ठोक विक्रेत्यानी भाजी पाल्याचा लिलाव केला नाही आणि शेतकऱ्यांनीही आपला भाजीपाला, दूध विक्रीसाठी आणलेच नाही. त्यामुळे हॉटेल व दूध डेरी या बंदमध्ये सहभागी झाले. 

शहरातील किराणा, कापड, भाजी मार्केट सह लहान-मोठे व्यवसायिकांनी आज या बंदमध्ये सहभाग नोंदविला. 

सर्वच शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस सह सर्व व्यवहार आजच्या बंदमुळे ठप्प झाले होते. 

विशेष म्हणजे सर्व धर्मीयांनीच आजच्या बंद मध्ये सहभाग नोंदविला होता त्यामुळे आज दिवसभर रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला आणि बंदही शांततेत पार पडला.                     
 

दुपारी दोन वाजता सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती महोदयांनाही निवेदन पाठविण्यात आले.

 त्या निवेदनात भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी ताबडतोब पावले उचलावी व वेळ पडल्यास आवश्यक ती कारवाई करावी असे नमूद केले आहे. 

बांगलादेशातील श्रद्धास्थान असुरक्षित वातावरणात आहेत आणि सर्व समाजच असुरक्षित झाल्याची चिंताही भारतीयांनी व्यक्त केली आहे. 

भारत सरकारने त्यात हस्तक्षेप करावा आणि तेथील हिंदूंच्या सुरक्षितेसाठी सर्व उपाययोजना करण्यात यावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

यावेळी अनिरुद्ध केंद्रे, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, श्रीनिवास नेम्माणीवार, स्वागत आयनेनीवार, नितीन मोहरे, डॉक्टर अशोक चिन्नावार, 

व्यापारी संघटनेचे चाडावार, रमेशचंद्र दारमवार, प्रशांत कुलकर्णी, किरण ठाकरे, जयंत मच्छर्लावार, संतोष रायेवार, 

राजेंद्र भातनासे, सतीश नेम्माणीवार, प्रशांत सातूरवार यांचे सह सकल हिंदू समाज बांधव उपस्थीत होते.