Ticker

6/recent/ticker-posts

हिंदू धर्मातील विकृती नाहीशी करून सुसंस्कृत समाज निर्माण व्हावा - ह. भ. प. श्री. नारायण महाराज


हिंदू धर्मातील विकृती नाहीशी करून सुसंस्कृत समाज निर्माण व्हावा - ह. भ. प. श्री. नारायण महाराज

 श्रावण मास महापर्व व पंढरपूर वारी मावंदे निमित्य भव्य तुळशीमाला धारण कार्यक्रम व किर्तन सोहळा 23 ऑगस्ट रोजी मांडवा तालुका किनवट येथे संपन्न झाला. त्याप्रसंगी आदरणीय महाराजांनी आपल्या प्रबोधनात सांगितले की, धर्माची जागा धंद्याने घेतली, बोधाची जागा विनोदाने घेतली, संस्काराची जागा सत्काराने घेतली व संस्कृतीची जागा विकृतीने घेतली म्हणून जो हिंदू समाज सुसंस्कृत होता तो या काळात विकृत होत चालला आहे. येणारे गणेश उत्सव, गौरी उत्सव,नवरात्री उत्सव व शारदा उत्सव या सण उत्सवात आलेली विकृती ही कोणी दुसऱ्याने आणली नसून त्या सण उत्सवांना आपणच विकृत केले आहे. म्हणून हे सर्व सण उत्सव आपल्या महापुरुषांनी ज्या उद्देशाने सुरू केले तो उद्देशच बाजूला राहिला असे सांगत असताना आजच्या तरुणांनी गळ्यात तुळशी माळ व कपाळी गंध टिळा लावून पारंपारिक वेशभूषेत आपल्या संस्कृती प्रमाणे येणारे सर्व सण उत्सव साजरे करावेत असे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला अतिशय उस्फुर्त प्रतिसाद देत जवळपास 100 तरुण मुला-मुलींनी या कीर्तन सोहळ्यात महाराजांच्या हस्ते तुळशीमाला धारण केली.
                    या कीर्तन सोहळ्यास किनवट माहूर तालुक्यातील तसेच विदर्भ व तेलंगणातील अनेक भाविक भक्त उपस्थित होते. हा कीर्तन सोहळा सनातन धर्म सेवा समिती मांडवा तालुका किनवट च्या वतीने आयोजित करण्यात आला होता.