किनवट तालुक्यातील मौजे घोटी ग्रामपंचायत अंतर्गत 15 वित्त आयोग योजनेअंतर्गत सन 2022 23 मध्ये झालेल्या 2 लक्ष 18 हजार रुपयांच्या अपहर प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करावेत, पैसा योजना, दलित वस्ती सुधार योजना,पांदण रस्त्यावरील अतिक्रमन तसेच ग्रामपंचायतच्या ऑपरेटर नियुक्ती प्रकरणी त्वरित सखोल चौकशीच्या मागणीसाठी दिनांक ३/१०/२०२४ रोजी पासून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा ईशारा घोटी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच बालाजी पावडे यांनी दिला आहे.
किनवट तालुक्यातील मौजे घोटी ग्रामपंचायत हि अनुसूचित क्षेत्रात असून पेसा योजनेत समाविष्ट आहे मागील काळात या ग्रामपंचायत अंतर्गत 15 वा वित्त आयोग योजनेतून गटविकास अधिकारी यांची परवानगी न घेता 2 लक्ष 18 कागदो पत्री झाल्याचे दर्शवून निधी हडप केला आहे. या संदर्भात दि 10- 7-2024 रोजी घोटी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकां ने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार दिली परंतु अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. घोटीचे सरपंच उपसरपंच व ऑपरेटर यांनी तत्कालीन ग्रामसेवकाची परवानगी न घेता डी एस सी चा गैरवापर केला असून पेसा योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या 8 लक्ष रुपयांच्या निधीत कोणतेही काम न करता परस्पर निधी उचल केला आहे पैसा योजनेअंतर्गत डिंक मोहफूल व तेंपत्ता संकलनाची कामे होणे अपेक्षित होते परंतु ग्रामपंचायतने दिनांक 14-3- 2024 रोजी सरोजोद्दीन शेख यांच्या नावे 2 लक्ष 30 हजार रुपये, 30-3- 2024 रोजी प्रसाद हार्डवेअर यांच्या नावे 1 लक्ष 30 हजार व दि 21- 6- 2024 रोजी नगदी स्वरूपात 20 हजार तसेच 1-7- 2024 ला 2 लक्ष 25 हजार रुपये उचल केले आहेत.
दलित वस्ती योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून दलित वस्त्यात कामे न करता गैरदलित वस्त्यात करून शासनाची व ग्रामस्थांची दिशाभूल व फसवणूक केली आहे. घोटी ते शीरमेटी जाणाऱ्या पांदन रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत वारंवार तक्रारी निवेदने सादर करून सुद्धा त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही
घोटी ग्रामपंचायतला नव्याने नियुक्ती केलेल्या ऑपरेटरची नियुक्ती नियमबाह्य असून पूर्वीच्या पंप ऑपरेटरचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना नव्याने ऑपरेटर निवडण्यात आला आहे जो बेकायदेशीर आहे.विद्यमान सरपंचांनी दिनांक 19- 11- 2022 रोजी पहिली ग्रामसभा घेतली परंतु त्यानंतर दिनांक 28-8- 2024 रोजी पर्यंत एकही ग्रामसभा घेतलेले नसून याप्रकरणी विवाद अर्ज दाखल केल्याने दिनांक 29 8 2024 रोजी नाममात्र ग्रामसभा घेतली आहे. घोटीचे सरपंच उपसरपंच तसेच पंचायत समितीच्या ऑपरेटरने संगनमताने लाखो रुपयाचा अपहार केलेला असल्यामुळे 15 वा वित्त आयोग, पेसा योजना,दलित वस्ती सुधार योजनेतील कामे व उचल केलेल्या निधीची सखोल चौकशी करावी तसेच घोटी ते शिरमेटी जाणाऱ्या पांदन रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ हटविण्याची कारवाई करावी, नव्याने नियुक्त केलेले ऑपरेटर राम शंकधरे यांची नियमबाह्य निवड तात्काळ रद्द करून कैलास पावडे यांना पूर्ववत ऑपरेटर म्हणून कार्यरत करून घ्यावे या मागण्यासाठी किनवट येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दिनांक ३/१०/२०२४ रोजी पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा घोटी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच बालाजी पावडे यांनी दिला आहे.