Ticker

6/recent/ticker-posts

किनवट गोकुंदा येथील गोपीकिशन मंगल कार्यालयात येथे दिनांक 19 जुलै रोजी आमदार भीमराव केराम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व गोकुंदा सरपंच अनुसया संजय सिडम


किनवट (प्रतिनिधी) गोकुंदा येथील गोपीकिशन मंगल कार्यालयात येथे दिनांक 19 जुलै रोजी आमदार भीमराव केराम  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व गोकुंदा सरपंच अनुसया संजय सिडम 

यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व बालविकास प्रकल्पअधिकारी अश्विनी ठकरोड यांच्या संकल्पनेतून पोषण सप्ताह  मोठ्या  उत्साहात संपन्न झाला.      

यावेळी आमदार भीमराव के राम ,म्हणाले की महिलांच्या प्रगतीसाठी  जेवढे प्रयत्न करता येईल तेवढ्या प्रकारे आमचे महायुतीचे सरकार करत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महत्वकांक्षी योजना सुरू केली. 

अशा अनेक कल्याणकारी योजना मधून महिलांना प्रगतीपथावर कशाप्रकारे आणता येईल असा आमच्या शासनाचा प्रयत्न राहील. 
  

यावेळी वंदना सुनील येलमेवाढ या चिमुकल्या मुलीने आपल्या अंग कौशल्याच्या द्वारे स्वागत गीत गाऊन मंचावरील उपस्थितांमध्ये वाहवा  मिळवली  गोकुंदा 

येथील अंगणवाडी कार्यकर्ते यांनी पोषण सप्ताह निमित्त सकस महिलांसाठी आहार कसा घ्यावा. विविध पदार्थ आणून प्रत्यक्ष करून दाखवले.  या कार्यक्रमानिमित्त महिलांनी विविध स्पर्धेचे आयोजन केले होते. 

यामध्ये रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, घेण्यात आल्या. रांगोळी स्पर्धेमध्ये अंगणवाडी कार्यकर्ते अर्चना संजय मरडे यांनी पहिला नंबर पटकावला. 

दुसरा नंबर नीतू खोब्रागडे, तिसरा नंबर तलांडे, व मेहंदी स्पर्धेमध्ये शेख यास्मिन व सुदृढ बालक म्हणून  संघवी धडेकर, श्रावणी धडेकर  इतर स्पर्धेमध्ये भाग घेऊन माननीय आमदार साहेबांच्या हस्ते स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात . 

कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  बाबुराव केंद्रे यांनी केले . यावेळी माजी सभापती दत्ता आडे, 

किनवट तालुका भाजपाध्यक्ष बालाजी आलेवार, भाजपा माजी तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, ग्रामपंचायत सदस्य पप्पू करनेवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्याची उपस्थिती होती. 
 

आमदार  भीमराव केराम यांचे स्वागत कविता गोणारकर, व सुनिता आडे  यांनी केले.
         

यावेळी महिला व बालकल्याण विभागाच्या विस्तार अधिकारी प्रवेशिका चंद्रकला पोले, दासरवार मॅडम धोंडगे मॅडम, कविता गोणारकर, जमुनाताई राठोड, गोदावरी कानींदे, सुमन बोडके, राजश्री पिल्लेवाड, गंगासागर मुकाडे ,सावित्रा झळके ,उषा कांबळे उमरेताई, सुजाता पाटील,अनिता क्षीरसागर सुशीला गायकवाड, राधाबाई केंद्रे याांच्यासह मोठ्या संखेने ही उपस्थित होते.