Ticker

6/recent/ticker-posts

किनवट न.प. क्षेत्रातील ऐतिहासीक वास्तु संविधान स्तंभ पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या साहेबराव पवार यांचेवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करणयाची मागणी.


किनवट न.प. क्षेत्रातील ऐतिहासीक वास्तु संविधान स्तंभ पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या साहेबराव पवार यांचेवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करणयाची मागणी.

(प्रतिनिधी) आज दि. 10/09/2024 रोजी सकाळी 10 ते 10.30 च्या सुमारास किनवट शहरातील ऐतिहासीक वास्तु संविधान स्तंभ 

किनवट येथील रहिवाशी साहेबराद पवार हा एका साथीदाराच्या सहाय्याने मोठी ड्रील मशिन घेऊन संविधान स्तंभ पाडण्याचा प्रयत्न करित होता. 

परंतू आजु-बाजूच्या लोकांनी हे पाहुन आम्हाला फोन केला व आम्ही लगेच किनवटचे पोलिस निरिक्षक मा. बिर्ला साहेब व न.प. मा. 

मुख्याधिकारी यांना फोन केला व न.प. व पोलीस यांचे कर्मचारी लगेच जागेवर गेल्यामुळे साहेबराव पवार हा तिथुन पळून गेला. 

या आरोपीवर त्वरीत देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे अन्यथा लोकशाही मार्गाने तिन जनांदोलन करण्यात येईल. 

त्या ठिकाणी परत काही करू नये यासाठी पावबंद करावे अशी ही मागणी मुख्याधिकारी न.प किनवत यांना करण्यात आली आहे.