Ticker

6/recent/ticker-posts

राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहाला माहूर येथे मंजूरीअमन कुंडगीर यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याला यशपद्मश्री मा.खा.डॉ.विकास महात्मे साहेबांचे विशेष


राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहाला माहूर येथे मंजूरी
अमन कुंडगीर यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याला यश
पद्मश्री मा.खा.डॉ.विकास महात्मे साहेबांचे विशेष आभार
किनवट ः साडेतीन शक्तीपीठा पैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र माहूर तीर्थक्षेत्रात राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहाला मंजूरी मिळाली असून, धनगर समाज संघर्ष समितीचे युवक प्रदेशाध्यक्ष अमन यांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. हे सभागृह माहूर लगत असलेल्या रुई येथे मंजूर झाल्याने अमन कुंडगीर यांनी एम्स नागपूरचे अध्यक्ष, धनगर समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष, पद्मश्री मा.खा.डॉ.विकास महात्मे यांचेसह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन व किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांचे विशेष आभार मानले आहे.
       

 गत अनेक दिवसांपासून अमन कुंडगीर यांनी माहूर तालुक्यात राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृह निर्माण करण्यात यावे या मागणीसाठी पद्मश्री मा.खा.डॉ. विकास महात्मे यांना वेळोवेळी निवेदन दिले. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांचेकडे मागणी लावून धरल्याने त्यांनी सभागृह मंजूरीसाठी मान्यता दिली. या मान्यतेमुळे समाजबांधवात व भक्तगणांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
      तसेच किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांचेमार्फत ही निवेदन देवून पाठपुरावा केला होता. सततच्या पाठपुरावा करून अमन कुंडगीर यांनी अखेर सभागृहाची ही मागणी जिद्दीने मंजूर करून घेतली. 
       1 कोटी रुपयाच्या खर्चातून या सांस्कृतिक सभागृहाचे भूमीपुजन लवकरच होवून बांधकामाला सुरूवात होणार आहे. या सभागृहाचे निर्माण होत असल्याने श्रीक्षेत्र माहूरगड येथे येणार्‍या समाजबांधवांना व मोठ्या संख्येने येणार्‍या भाविकांना याचा लाभ होणार आहे. माहूर शहरातील व परिसरातील नागरीकांना लग्न व इतर छोट्यामोठ्या शुभकार्यासाठी याचा उपयोग होणार आहे. या साठी राजू सौंदळकर नीलकंठ मस्के अमोल काटकर लव गावंडे अक्षय डुरके व सर्व समाज बांधव यांनी सहकार्य केले.असे युवक प्रदेशाध्यक्ष अमन कुंडगीर यांनी सांगीतले.
मा.खा.डॉ.विकास महात्मे यांनी कोणत्याही विकासकामांसाठी नकार दिला नाही. कोणतेही काम त्यांच्यामार्फत अतितातडीने होते. ते मला वेळोवेळी विकासकार्यात नेहमी मदतीचा हात देतात. 

श्रीक्षेत्र माहूर येथे राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहाला मंजूरी द्यावी

 या मागणीसाठी त्यांना निवेदन दिले असता त्यांनी जातीने लक्ष घालून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीष महाजन यांना निवेदन पाठवून त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केल्याने मी त्यांचे खूप खूप आभार मानतो.
                           -अमन कुंडगीर