Ticker

6/recent/ticker-posts

83-किनवट विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची 26 नोव्हेंबरला लेखा पुनर्मळ बैठक



83-किनवट  विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची 26 नोव्हेंबरला लेखा पुनर्मळ बैठक

किनवट : भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 83 -किनवट विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची आणि निवडणुक खर्च संनियंत्रण कक्ष यांच्या खर्चाचा ताळमेळ आणि तपासणी करणे हेतू व दिनांक 23 नोव्हेंबर 2024 अखेरपर्यंतचा करण्यात आलेल्या खर्च यानुषंगाने  दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी  चे सकाळी 10  ते 5 या वेळेत निवडणूक खर्च पथक कक्ष,  आयटीआय,  किनवट परीसर येथे दैनंदिन खर्चाच्या लेखा पुनर्मेळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सोबत येताना बँक स्टेटमेंट, करण्यात आलेल्या खर्चाच्या पावत्या, सभा, पदयात्रा, रॅली, वाहन परवाने इत्यादी अनुषंगिक खर्चाच्या  माहितीसह उमेदवाराने उपस्थित रहावे, असे आवाहन 83-किनवट  विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली (भाप्रसे) यांनी केले आहे.
          अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार कार्यवाहीस पात्र असतील तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1051 कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तिन वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह ठरविण्यास पात्र असेल याची नोंद घ्यावी. असेही83 - किनवट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली (भाप्रसे) यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळविले असल्याचे सहायक खर्च निरीक्षक  सुनिल पाईकराव आणि खर्च पथक प्रमुख संजय भंडारे  यांनी कळविले आहे.