Ticker

6/recent/ticker-posts

किनवट – बांगलादेशात हिंदू आणि अल्पसंख्याक समाजावर कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. या विरोधात जागतिक मानव हक्कदिनी मंगळवारी दि. १० किनवट तालुक्यातील सकल हिंदुधर्मीय


किनवट – बांगलादेशात हिंदू आणि अल्पसंख्याक समाजावर कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. या विरोधात जागतिक मानव हक्कदिनी मंगळवारी दि. १० किनवट तालुक्यातील सकल हिंदुधर्मीय नागरिकांकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते सहायक जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढण्यात आली.

न्याययात्रेचे नेतृत्व विश्व हिंदु परिषदेचे देवगिरी प्रांत उपाध्यक्ष प.पू.सुरेश महाराज, प.पू.नरसिंग महाराज पेंदेकर, सुनील महाराज आंदबोरीकर यांनी केले. या यात्रेत शहरातील विविध पक्षातील हिंदु नागरीक, सामाजिक कार्यकर्ते, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, महिला, युवती मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. निवेदनावर सुरेश महाराज, नरसिंग महाराज, अनिरुध्द केंद्रे, संतोष तिरमनवार, कपील कांबळे, डॉ. उपासणी, जयंत मच्छर्लावार, डॉ. संदीप जन्नावार, रोहित चाडावार, प्रशांत सातुरवार, संतोष रायेवार, अशोक ओद्दीवार, व्यंकट सातुरवार, प्रवीण राठोड, सागर शिंदे, अनुराधा उपासणी, वृषाली वैद्य, आरती कुलकर्णी, अंजली राठोड, सौ. विद्या पाटील, पायल कनाके यांच्यासह अनेक नागरीकांच्या स्वाक्ष-या आहेत.
यात्रेत भाजपाचे दिनकरराव चाडावार, अशोक नेम्मानीवार, शिवराज राघु मामा, स्वागत आयनेनीवार, मुकुंद नेम्मानीवार, डॉ. अशोक चिन्नावार, अक्षय भोयर, अक्षय काकडे, गंगुबाई परेकार, संगीता भंडारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैजनाथ करपुडे पाटील, मनसेचे नितीन मोहरे यांच्यासह सुनील आयनेनीवार, मुकुंद लोखंडे, निलगिरवार , प्रशांत कुलकर्णी आदींसह अयप्पा स्वामी दीक्षाधारी भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.