Ticker

6/recent/ticker-posts

मेडिकल असोसिएशन कडून रक्तदान शिबिराचे आयोजन


मेडिकल असोसिएशन कडून रक्तदान शिबिराचे आयोजन 

श्रीक्षेत्र माहूर 

माहूर तालुका मेडिकल असोसिएशन केमिस्ट ड्रगिस्ट संघटने कडून दि 24 रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अखिल भारतीय मेडिकल असोसिएशन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारत देशात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून माहूर मेडिकल असोसिएशन केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे माहूर तालुका अध्यक्ष समर भाऊ त्रिपाठी यांचे कडून हॉटेल कृष्णा पॅलेस येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समर भाऊ त्रिपाठी यांनी दिली आहे 

माहूर तालुक्यातील  श्रीक्षेत्र माहूर मौजे वानोळा वाई बाजार कुपटी आष्टा  येथे मेडिकल केमिस्ट आणि ड्रगिष्ट  मेडिकलची एकूण 55 दुकाने असून या संघटनेकडून दरवर्षी रक्तदान शिबिराचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येते मेडिकल संघटनेच्या पदाधिकारी सदस्यासह शहरातील नागरीकही मोठ्या प्रमाणात या रक्तदान शिबिरात रक्तदान करतात 
या शिबिरात मेडिकल असोसिएशन सह वैद्यकीय संघटना कडून मोठ्या प्रमाणात रक्तदान होणार असल्याने या शिबिरात रक्तदान करण्याचे आवाहन माहूर तालुका केमिस्टं अँड ड्रगिस्ट मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष समर भाऊ त्रिपाठी प्रशांत जहागीरदार रितेश देशपांडे फैसल बावाणी सुनील कलाने जावेद खीच्ची सुनिल गोविंदवार सचिन बेहेरे शेख परवेज शेख मुसा प्रतीक प्रतीक चुंगडे तौसिफ बावाणी घनश्याम केशवे इसाद कुरेशी यांचे सह मेडिकल संघटने कडून करण्यात आली आहे