किनवट तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.
किनवट शहरांमध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा रक्तदान शिबिर , यासारख्या विविध उपक्रमाने किनवट शहरांमध्ये शिवजयंती मोठ्या थाटात व हर्ष उल्हासामध्ये साजरी करण्यात आली.त्यासह मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी चौकामध्ये ही जयंती साजरी झाल्यानंतर आमदार भीमराव के राम यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले व अल्पो उपहाराची व्यवस्था शिवप्रेमी मंडळीसाठी करण्यात आली होती.यावेळी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या पत्नी बेबीताई नाईक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी व शिवप्रेमी मंडळींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती. त्याचबरोबर इस्लापूर शहरांमध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने इस्लापूर येथील शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना गावातील विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने, प्रतिष्ठित नागरिक व्यापारी व शिवप्रेमीच्या वतीनेअभिवादन करण्यात आले. व परिसरामध्ये मोटार सायकल रॅली चे भव्य आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जमलेल्या शिवप्रेमी पैकी अनेक शिवप्रेमी मंडळीने शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर मत व्यक्त केले.