Ticker

6/recent/ticker-posts

इस्लाम धर्माचा पवित्र रमजान महिन्यात १०वर्षीय आयशा फातिमा सय्यद इमरान अली ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजाकिनवट:

इस्लाम धर्माचा पवित्र रमजान महिन्यात १०वर्षीय आयशा फातिमा सय्यद इमरान अली ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

किनवट: 
:-इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये ३० दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील पत्रकार सय्यद इमरान अली यांची १० वर्षाची मुलगी आयेशा फातिमा यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा रविवार 9मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी ५.१० वाजता सुरू होत असून संध्याकाळी ६.२८ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्यानी पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवली.त्यामुळे आयेशा फातिमा सय्यद इमरान अली यांचे सर्व्र कौतुक होत आहे.