Ticker

6/recent/ticker-posts

किनवट नगर परिषदेचा अजब कारभार फक्त सी सी रोड सीसीनाली अशा मुनाफ्याच्या कामाकडे नगरपरिषद व नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे लक्ष नागरिकांच्या मूलभूत


किनवट प्रतिनिधी 
किनवट नगर परिषदेचा अजब कारभार फक्त सी सी रोड सीसीनाली अशा मुनाफ्याच्या कामाकडे नगरपरिषद व नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे लक्ष नागरिकांच्या मूलभूत गरजा कडे दुर्लक्ष जागोजागी पाईपलाईन फोडून सीसी रोड केली जात आहे सीसी रोड केल्यानंतर पाईपलाईन करिता तेच सीसी रोड फोडले जात आहेत परत तेच सीसी रोड पुन्हा बनवल्या जात आहेत हा अजीब गरीब धंदा किनवट नगरी परिषद अंतर्गतच होऊ शकते मागील पाच ते सात वर्षांपासून चालू असलेले पाणीपुरवठ्याचे काम अद्याप सुद्धा पूर्णत्वास आले नाही किनवट शहरातील विविध ठिकाणी विविध प्रभागात विविध गल्ल्यांमध्ये आज सुद्धा नगर परिषदेच्या नळाद्वारे पाणी पोहोचलेलं नाही इतकच नव्हे खूप ठिकाणी मेन पाईपलाईनला पाईप जोडणे सुद्धा झालेले नाही जसे कुंभार गल्ली लोहार गल्ली सुभाष नगर खोजा कॉलनी शिवाजीनगर चा काही भाग भगतसिंग नगर अशोक स्तंभ मेन रोड किनवट अशा व अनेक ठिकाणी मेन पाईपलाईन ला पाईपलाईन जोडण्यात आलेले नाही च्या कारणाने नागरिकांना नळ कनेक्शन असून सुद्धा त्याद्वारे पाणी मिळत नाही नगर परिषदेचा कर्मचाऱ्यांचा फक्त न फक्त विकास कामाच्या नावाखाली मलाईदार काम जसे की सीसी रोड सीसीनाली डांबर रोड यावर जास्त भर आहे नागरिकांच्या मूलभूत सुविधा कडे कुणाचेही लक्ष नाही किनवट शहरातील प्रत्येक वार्डामध्ये आज अंधारात अंधार आहे मेन लाईन मेन रोड हनुमान मंदिर पासून ते कलेक्टर ऑफिस पर्यंत ही मुख्य लाईन आहे ती सुद्धा अनेक दिवसापासून बंद असते आणि गुढीपाडव्याच्या व ईदच्या दिवशी सुद्धा शहरातील मेन स्ट्रीट लाईट बंद होते कारण की पैसे न भरल्या कारणाने एम एस सी बी यांनी नगर परिषदेचा मेन स्टेट लाईटचे कनेक्शन कट केले या मूलभूत गरजा व सुविधांकडे नगर परिषदेचे कुठलेही लक्षण आहे तसेच उन्हाळ्याच्या दिवसात नागझरी येथून येणारे पाण्याचे कनेक्शन सुद्धा संबंधित कार्यालयाने टाळे ठोकले होते दोन दिवस या कारणाने किनवट शहराला पाणीपुरवठा बंद होता ही लाजिरवाणी गोष्ट आहे असे अनेक प्रश्न आज किनवट शहरात भेडसावत आहे शहराचा वाली कोण हा प्रश्न नागरिकांतून वारंवार विचारण्यात येत आहे घनकचरा व्यवस्थापन नाली रोड कचरा तुडुंब भरलेले गटर नाल्या हे सुद्धा साफ करण्यात येत नाही असे अनेक प्रश्न ज्याच्याकडे नगरपरिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष आहे ह्या व अशा प्रकारच्या अनेक समस्या जर का वेळ असतानाच पुरवल्या जाणार नसतील सुधारला जाणार नसतील तर नागरिकांना प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल